उल्हास राणे - लेख सूची

एक डॉक्टर असलेला इंजिनीअर!

डॉक्टर चिंतामणी मोरेश्वर पंडित किंवा सी.एम. पंडित यांच्याशी झालेली माझी पहिली ओळख लोकविज्ञान संघटनेच्या माध्यमातून, लोकविज्ञानच्या सुरुवातीच्या काळात सर्व बैठका श्री.म.ना.गोगटे यांच्या ‘ताडदेव एअर-कंडीशन्ड मार्केट’मधील कार्यालयात व्हायच्या. मी अधून मधून त्यात सहभागी व्हायचो. पंडितांचे कार्यालयही तिथेच होते. गोगटे आणि पंडित दोघेही स्थापत्यतज्ज्ञ आणि दोघेही मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक सदस्य त्यामुळे लोकविज्ञानच्या काही बैठकांत दोघांचाही सहभाग …

‘एक विश्व एक स्वप्न’

काल (८ ऑगस्ट २००८) संध्याकाळी दूरदर्शनवर बीजिंग ऑलिंपिक्सचा मंत्रमुग्ध करणारा उद्घाटनसोहळा पाहिल्यापासून मनात अनेक विचारांनी गर्दी केली आहे. दोन वर्षांपूर्वी सुमारे याच सुमारास एक महिनाभर मी चीनमध्ये थोडीफार भटकंती केली. दक्षिण, मध्य आणि पूर्व चीनच्या काही शहरांतून मी फिरलो. दुभाष्या-मार्गदर्शकांच्या (सर्व तरुण मुली) सहाय्याने चीनचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक चीनसंबंधीची सरकारी धोरणे आणि त्यासंबंधीची लोकमते …

स्त्रियांवरील अत्याचार

गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात बंगलोरमधील एका महिला संघटनेने स्त्री-सखी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात अनेक स्त्री-पुरुषांनी महिलाविषयक प्रश्नांवर चर्चा केली, अनेक नवीन प्रश्नांना वाचा फोडली. या मेळाव्यातील श्रोत्यांच्या सहभागासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम योजला होता. आयोजकांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून असे प्रश्न वेगवेगळ्या चिठ्यांवर लिहून ते श्रोत्यांमध्ये सोडत पद्धतीने वाटले. नंतर त्या श्रोत्यांनी या प्रश्नांना …

नागरी-जैविक विविधता (भाग २)

नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण ५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन: ५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला …

नागरी-जैविक विविधता (भाग १)

१. प्रस्तावना:जगाची ५० टक्के लोकसंख्या आता नगरांमध्ये राहते. पुढील तीस वर्षांत हे प्रमाण ६१ टक्के होईल. (युनो अहवाल १९९७). विकसित देशांमधील ८० टक्के लोक नागरी विभागात राहतात. असे असूनही एकविसाव्या शतकात मात्र सर्वांत मोठी लोकसंख्येची नगरे विकसनशील देशांमध्येच असतील. गेल्या शतकात नगरांचे आकारमान प्रचंड वाढले. ३०० नगरांत १० लाखांपेक्षा, तर १६ नगरांत १ कोटीपेक्षा जास्त …